प्रत्येकाची सुखाची अशी आपापली व्याख्या असते.
कोणाला कशात सुख मिळेल हे दुसर्याला नाही सांगता येत!
उंचावर उडणार्या फुलपाखरा मागे कधी लहान मुलांना धावताना बघितले आहे? तसेच आपण देखिल सुखाच्या मागे-मागे सैरभैर धावत असतो राहतो. पण बर्याचदा आपण शांत उभे राहीलो की तेच फुलपाखरु आपल्याच अंगाखांद्यावर आपणहुन येउन बसतं. सुखाचही असचं असतं का?
सुख-सुख म्हणजे नक्की काय?
आजीच्या गोष्टी? की वरणभातावर सढळ हाताने ओतलेलं तुप?
३०० रुपयांचा पिझ्झा? की ५ रुपयांचा वडापाव?
झकास आडव होऊन वाचलेलं पुस्तक? की एकाच बैठकीत संपवलेली मोठ्ठी कादंबरी?
रात्री उशीरा पर्यंत गप्पा मारुनही सकाळी ५ ला उठणे? की अगदी १० वाजताच अंथरुणात शिरुन सकाळी ९ वाजता आळस देत उठणं?
पाय तुटेपर्यंत केलेली पायपीट? की नदीकीनारी तासनतास बसणं?
संगीतातलं ओ की ठो कळत नसताना कधी पं.रवीशंकर कींवा कुमार गंधर्व तासनतास विनाकारणच ऎकले आहेत का कधी? नसेल तर ऎकुन बघा! कदाचित आपण शोधत असलेलं सुख त्यातच मिळेल.
- © सौरभ वैशंपायन(मुंबई).
5 comments:
Typical WaPu type write-up. Good though.
खरच ....... छान आहे
1)मोबाईल बद्दल लिहीलेले माझ्या वृत्तीला चपखल बसते.
2)To arrest the further thinking of native men,the colonists had written off the scriptures like Vedas.
---------
Ameya Sathe
http://logicomechanophile.blogspot.com
---------------
ओ की ठो कळत नसताना कधी पं.रवीशंकर कींवा कुमार गंधर्व तासनतास विनाकारणच ऎकले आहेत का कधी? नसेल तर ऎकुन बघा! कदाचित आपण शोधत असलेलं सुख त्यातच मिळेल.
kharach milat barakaa sukh....
सही माहिती दिली आहे..खूपच छान..मुद्देसूद आणि वाचकांना बांधून ठेवणारी ..
Post a Comment