CCNA च्या परीक्षेसाठी आयडेंटिफिकेशन प्रुफ लागेल म्हणुन मी त्या डॉक्युमेंट्सची जमवजमव करु लागलो तेव्हा माझ्या लक्षात आले.............. मी अजुन माझे VOTER ID CARD काढलेलेच नाहिये. हे सांगणे काहि भुषणावह नाहिये, उलट २४ वर्षांच्या मुलाकडे अजुन VOTER ID CARD नाहिये हि अत्यंत चुकिची गोष्ट आहे. मागच्या निवडणुकिच्या वेळी मी लक्षच दिले नाहि. मात्र आता ती चुक सुधारेन म्हणतोय. तुमचे भारतीय नागरीकत्वा बरोबरचे राहत्या ठिकाणेचे प्रुफ म्हणुन तर तुम्हि त्याचा सगळीकडे वापर करु शकताच पण महत्वाचं म्हणजे तुम्हि तुमचा मतदानाचा हक्क बजावु शकता. तुमचे एक मत फरक पाडु शकते. मी अधिक माहिती करीता टाटा ने चालवलेल्या “जागो रे!” मोहिमेच्या साईटवर चक्कर टाकुन आलो. अतिशय छान आणि माहितीपूर्ण साईट आहे. आम्हि गरीबी, भ्रष्टाचार, अन्याय, सुरक्षा यांच्यावर ताशेरे ओढतो पण मतदानाला कितीजण बाहेर पडतात? खरतर ९०% पेक्षा कमी मतदान होणं हि आपल्या मतदारसंघाला लाज आणणारी गोष्ट आहे. कश्मिरात निदान अतिरेक्यांच्या धाकाने कमी मतदान होतं इथे आमचा आळस नडतोय! मग झोपडपट्टितले दादा पैसे घेतात आणि आजुबाजुची त्यांची अनुयायी आणि चेले मंडळी त्याच्या एका शब्दाखातर अथवा धमकिखातर सांगितल्या निशाणीवर ठप्पा लावतात. मग पैसे चारुन सत्तेवर येणारे अनेक महाभाग नगरपालिकेत, विधानसभेत आणि लोकसभेत बसतात. प्राथमिक इंग्रजी धड बोलु न शकणार्या शिक्षणमंत्र्यांच्या हातात आमच्या शिक्षणाचे सुकाणु दिले जाते, घोटाळे करणारे, मर्डर चार्ज असलेले गुन्हेगार उजळमाथ्याने पोलिस संरक्षणातुन फिरतात. आणि आम्हि ये रे माझ्या मागल्या करत “सिस्टिमला” दोष देत सकाळची ८:१०ची गाडि पकडण्याच्या चिंतेत हरवुन जातो.
सुशिक्षित म्हणवणारे आम्हि आमचा हक्कच बजावत नाहि. टाटाच्या त्या साईटवर – “तुम्हि या आधी कधी मतदान केले आहे का?” या प्रश्नावर ४५% लोकांनी “होय!” तर ५५% लोकांनी “नाहि!” असे उत्तर दिलेय. म्हणजे जे इंटरनेट वापरु शकतात, ज्यांना लिहिता-वाचता येते किमान पातळीवरील चांगल्या-वाईटाचा विचार करु शकतात त्यापैकी ५५% टक्के लोकांनी मतदानच केलेले नाहिये. दुर्दैवाने मीहि त्यातला एक आहे. पेज थ्री वरील लोकं फक्त फोटो काढुन घेण्यासाठीच मतदान केंद्रांवर येतात याबाबत मी नि:शंक आहे. झोपडपट्ति अथवा मेंढरे कॅटेगरीतली माणसं पैसे, दारु, चिकन यांना भुलुन सांगेल तिथे शिक्का मारतात. मग मध्यमवर्गिय माणुस काय करतो? घरी बसुन “हॅट सालं देशाचं काहि खरं नाहि! अमुक एक पार्टि आली तर देशाला विकुन खाईल, तमुक पार्टी आली तर धार्मिक तंटे वाढतील, सोम्याने इतक्या करोडचा घोटाळा केला होता तरी जिंकला! गोम्या चांगला आहे पण लोकं मागे नाहि त्याच्या! ” असे म्हणत मान झटकुन नेमेची येतात निवडणुका” या ठेक्यावर ते विचार उडवुन देतो!
VOTER ID CARD मिळवण्यासाठी काय करावं लागतं याची देखिल माहिती नसते. असली तरी बरेचजण त्याकडे लक्ष देत नाहि. असो, जास्त डोकं न खाजवता याबाबत माहिती हवी असेल तर सरळ TATAच्या http://jaagore.com/ या साईटवर जा. तिथे “REGISTRATION PROCESS” वर क्लिक करा - http://jaagore.com/faq.html#1 इथे तुम्हांला हवी ती सगळी माहिती मिळेल.
“अपने को क्या करनेका है!?” या मुंबईय़्य़ा भाषेतील प्रश्नाने सगळ्याची वाट लावली आहे. मात्र हा प्रश्न मी तरी पुन्हा विचारणार नाहि. येत्या ७-८ महिन्यात महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आहेत. त्यात ज्याचे माप त्याच्या पदरात टाकायला मी तयार होतोय. सगळे एक प्रश्न विचारतात – “सगळेच चोर आहेत साले,काय फरक पडणार?” तर त्यांना सांगतो – मग त्यातल्या त्यात कमीतकमी चोर असेल त्याला वोट करा.
उठा, दाखवा तुमची ताकद! “YOU” can make a difference!
निवडणुकिच्या दिवशी जर तुम्हि वोट करत नसाल तर तुम्हि झोपला आहात, आपणच झोपलो तर देश कसा जागेल? जागो रेऽऽऽ
- सौरभ वैशंपायन.
4 comments:
sourabh
nice written
u get ur voter i/d card & vote in coming elections.
Very nice written Saurabh !!!!
chaan lihilas surabh..
thanks..!!
Actually jaagore.com is a big eyewash. They collect personal information of people and prompt a mesage on screen that we will contact you with details of your nearest registration center , but they never contact. I really doubt that TATA sons might use these personal details for their marketing purpose.
Post a Comment