प्रिय लोकमान्य!
पत्र लिहीण्यास कारण की............
तुम्ही शेंगा खाउन टरफ़ले टाकण्यार्या त्या मुलांची नावे त्यावेळी सांगायला पाहिजे होती.
कारण आज त्यांचे वंशज पैसे खातात, आणि पैश्यांना टरफ़ले नसतात म्हणुन कोणाला कळतही नाही.
आणि आम्ही... तुमचे वंशज म्हणावणारे, आजही आम्ही कोणाचे नाव सांगत नाही, इतुकी एक गोष्ट मात्र तुमच्याकडुन आम्ही आवर्जुन घेतली.
आणि हो अजुन एक गोष्ट, तुम्हाला सुपारीचे खांड आवडायचे म्हणे, मी सुद्धा आवडीने सुपारी खातो.
तुमचा ’कित्ता’ नाहि तरी ’अड्कित्ता’ तेव्हढा गिरवला.
तुमचा ’चुकलेला अनुयायी’
- सौरभ वैशंपायन.
1 comment:
ha ha ha! sahi.
Post a Comment