Friday, September 28, 2007

हे राम!



केंद्र सरकार आणि माननिय श्री.करुणानिधी यांनी आपल्या डोळ्यांवर गेली अनेक शतके जी झापडे चढली होती ती दुर करुन फार मोठी कृपा केली आहे.आमचे पूर्वज आंधळ्या सारखे कोण्या रामाची पूजा करुन काल्पनिक गोष्टि आम्हाला सांगत होते. कीमान आमच्या पुढची पिढी या मायाजालात अडकणार नाहित.
चला मग रामसेतु तोडुन टाकुया.रामच नव्हता तर मग रामसेतु कुठुन येणार?
पण मग रामाच्या जन्मापासुनच सगळी जळमते काढुन टाकुया.रामाच्या जन्माआधी कोणी वाल्मिकी म्हणुन ऋषी होते म्हणे, त्यांनीच ’रामायण’ कथा लिहीली.पण रामाशी संबधीत सगळ्याच गोष्टी संपवायच्या असतील तर आधी वाल्मिकी ऋषीं पासुन त्याची सुरुवात व्हावी.मग वाल्मिकींचे अस्तित्व आपण अमान्य करु, पण मग ओबीसी आणि आरक्षण असलेल्यात एक वाल्मिकी म्हणुन जात आहे म्हणे, मग तिचे ही नाव बदलावे लागेल.मात्र बदलण्याआधी आर.पी.आय. गटाला विचारायला लागेल(काय गंमत आहे, हींदुंचा तिरस्कार करणर्यां कडुनच वाल्मिकींचे नाव मिटवण्याची परवानगी घ्यावी लागतेय!)नाहीतर मग आठवले आणि मंडळी राम नाही निदान वल्मिकी वाचवण्यासाठी आंदोलन करतील. त्यांनी मान्यता दिली तर ठीक नाहीतर करुणानिधींकडे त्यांना पाठवावे लागेल.
हा आता अयोध्येकडे वळुया. बाबराने राम-मंदीर पाडुन आधीच करुणानिधीं, केंद्र सरकार आणि आपले काम आधीच सोपे केलेय बघा त्या बाहेरुन आलेल्या बाबराला राम नाहीये हे आधीच माहीत होतं.आता अयोध्येचं नाव बदलुन बाबरीस्तान वगैरे ठेवुया.
राम म्हणे १४ वर्ष वनवासात आला होता.त्यावेळी महाराष्ट्राचे नाव सुद्धा नव्हते एक दंडकारण्य म्हणुन जंगल होते.
तिथेच आत्ता नशिक आहे तिथेच हनुमान म्हणुन एक वानर रामाला भेटला आणि मग पुढे त्याने लंका दहन केले.असं कधी असतं का? चला या हनुमानाची नामोनिशाणी मिटवुया, रामदास स्वामी आणि गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला चुकीच्या मार्गाने पाठवले होते. संत शिरोमणी करुणानिधींनी मात्र खरी वाट दाखवली.म्हणुन रामदसांनी स्थापन केलेले ११ मारुति तिथुन काढुन टाकुया.
हां‌‍ऽऽऽ आता रामसेतुकडे वळायला हरकत नाही, मात्र जाताना ’रामेश्वरमच” मंदीर हटवायला विसरु नका. रामच नव्हता तर तो ते मंदीर कसे स्थापन करणार? लगेच पाडायचे!
हा आला रामसेतु........कोण्या नल-नील नावाच्या वानरांनी रामाचे नाव घेउन हा बांधुन काढला होता....काहीतरीच आचरट्पणा. पण अजुन एक राहीले, आपण श्रीलंकेचे नावच बदलले तर? राम नाही म्हणजे रावण देखिल नाही.मग लंकेत आणि दक्षीण भारतात काही ठीकाणी जी रावणाची पुजा होते ती थांबवुया. हांऽऽऽऽऽऽ तर आपण श्रीलंकेचे नाव बदलण्या बाबत बोलत होतो. पण ते आपण कसे बदलणार? त्यासाठी लंकेच्या अध्यक्षांना ते सांगावे लागेल, नाहीतर आहेतच करुणानिधी स्वामी.

आता या पुढे कोणी-कोणी रामाचे नाव घ्यायचे नाही. एकमेकांना भेटल्यावर जय श्रीराम कींवा जय रामजी की! पण म्हणायचं नाही. हरे राम! हरे कृष्ण! नाही म्हणायचं(नुसतं हरे कृष्ण म्हणालात तर कादाचित चालेल, अजुन तरी श्री जगद्गुरु करुणानिधींनी कृष्णावर आक्षेप घेतला नाहीये!) इतकच काय कोणी मेलं तरी रामनाम सत्य है! देखिल नाही म्हणायचं. आणि हो, महात्मा गांधींच्या समाधीवर "हे राम!" असं जे लिहीलय ना तेही काढुन टाकुया.

चला तर मग, कधी निघायचं रामसेतु तोडायला?
म्हणजे सगळे एकत्र जाऊया म्हणजे वेळ-श्रम-पैसा वाया नको जायला ना! शिवाय मला नाही मिळाला रामसेतु तोडायला असे रुसवे-फ़ुगवे पण नकोत.

काढु कंबरेच आणि गुंडळुया डोक्याल्या, आहे काय नाही काय?
फुंकुन टाकुया हिंदु धर्माचं दिवाळं! अजुन आपण हिंदु करुच काय शकतो?


चला मग कधी निघायचं रामसेतु तोडायला! कळवा मला.


ब्रह्मांड्नायक राजाधिराज योगीराज श्री श्री श्री करुणानिधी महाराज की जय!




- © सौरभ वैशंपायन(मुंबई).

1 comment:

Anonymous said...

Nice..
www.marathimati.com