भारत भू चे सुपुत्र आम्ही,
निष्ठा अमुची नचिकेताची;
झुंजुनी जिंकु आव्हानांना,
जिद्द आमची भगीरथाची ॥१॥
बृहस्पतिची बुध्दी अमुची,
शक्ती अमुची बलभीमाची;
उलथुन टाकु अन्यायाला,
दिक्षा अम्हा ’भृगुराजाची’॥२॥
चाणक्याची नीती अमुची,
छाती अमुची हनुमानाची;
शक्ती-भक्तीची वाहि गंगा
परंपरा ही अभिमानाची॥३॥
भोळे आम्ही सांबसदाशीव,
अन लबाड आम्ही कान्हापरी;
काहि वेळा रचीतो क्रिडा,
करीतो तांडव भोळे जरी॥४॥
दधीच ऋषीचा त्याग अमुचा,
अन दानत अमुची कर्णाची;
प्रतीसृष्टीचे स्पप्न आमुचे,
ताकद विश्वामित्राची॥५॥
- सौरभ वैशंपायन.
3 comments:
chhanch!!
fakt na 4th kadava thoda khataktay mhanje mala kavita karta yet nahit mhanun bolaycha ki nahi vichar karat hote pan 3-4da vachun pahilyawarhi nit yet nahiye, kadachit tumhi kaitemadhla "meter" vagaire mhanta te jamat nahiye!
kharach kavita khup chan aahe keep it up!
Post a Comment