Saturday, February 16, 2008

नयन तुजसाठी आतुरले.

काळ्या-निळ्या आकाशात, वस्त्र मेघांचे विरलेले,
अन त्या विरल्या वस्त्रांतुनी, किरण रवीचे शिरलेले ॥१॥

हिरव्या-हिरव्या पानांमधुनी, श्रावणथेंब जीरलेले,
पंखांवरील झटकुनी पाणी, खग नभात विहरलेले ॥२॥

जाणवती कानांमागे, उष्ण श्वास हुरहुरलेले,
हातात घेऊनी हात, दुरवर फिरलेले ॥३॥

स्पर्श तुला करताना, गुलाब लाजेचे चुरलेले,
सखे ये निघोनी, नयन तुजसाठी आतुरले ॥४॥

-सौरभ वैशंपायन.

1 comment:

Jaswandi said...

kya baat hain saurabh.. he V day special mhanaycha ka?
mastach re! kasa kay jamata tula itka vegveglya prakare uttam lihayla?

i luvd it.. specially for "lele" :)