पहाटेचा गार वारा, चांदण्याहि उठुन गेल्या,
जवळ घेताच तु मला, पापण्या अलगद मिटुन गेल्या. - १
संथ लयीतले तुझे श्वास, सुरासारखे फिरु लागले,
अन दुणावलेले श्वास माझे, त्यामध्येच विरु लागले. - २
मोहरल्या गात्रांमधुनी, थरथरे अजुन उरली रात,
अजुन अन घुमतात, गुज तुझे कानात. - ३
आताशा जराशी सैल, मजभोवती रेशीमगाठ,
त्यातच गुंतत होतो, इतक्यात झाली पहाट. - ४
- सौरभ वैशंपायन.
4 comments:
क्या बात है!
मस्त कविता आहे.
तुझा ब्लॉग आवडला. असंच नवनवीन वाचायला मिळो या ब्लॉगवर ही आशा व्यक्त करतो.
अनेक शुभेच्छा.
-प्रशांत
Aaah!
maan gaye!
sahich!!
sundar kavita!
Sundar
kharach khupach sunder
Post a Comment