People for the Ethical Treatment of Animals (PETA) हि संस्था मुक्या प्राण्यांच्या छळा विरुध्द आवाज उठविते. त्यात मांसाहार करु नका, प्राणीजन्य सौंदर्य साधने वापरु नका हे आणि असे अजुन बरेच मुद्दे ते लोकांसमोर मांडतात. मांसाहार करावा कि नाहि हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसेच एखाद्या जातीने मांसाहार करावा किंवा करु नये यावरहि माझे काहि म्हणणे नाहि. मी स्वत: शाकाहारी आहे(खरंतर मी अंड खातो, पण गेल्या वर्षी ट्रेकला मोजुन १ अंड खाल्ल होतं, त्या आधी जवळपास २-३ वर्ष तेहि खाल्ल्याचं मला आठवत नाहि.)
मांसाहार न करण्याची माझी कारणे -
१)फक्त माझ्या जीभेला चांगलं लागतं म्हणुन हाल-हाल करुन एखाद्याचा जीव घेणं मला पटत नाहि.
२)वरील वाक्यावर काहि "विद्वान" म्हणतात मग झाडांना जीव नसतो का? पण त्यात फारसे तथ्य नाहि, कारण झाड(धान्ये,पाला,फळे etc.) परत उगवु शकते. मुठभर गव्हापासुन किलोभर गहु सहज परत मिळु शकतो. किंवा साधी कोथींबिर जरी बाजारातुन आणली आणि एखाद्या भांड्यात पाणी भरुन ठेवली तर हिरवीगार राहु शकते. फाळातल्या बी पासुन शेकडो फळे देणारे नविन झाड उगवु शकते. कोंबडि किंवा बकरीचा एक पाय तोडुन तिला बाजुला ठेवली तर तिथे दुसर पाय़ फ़ुटणार आहे का? किंवा कोंबडिचं पिस खुराड्यात ठेवले तर नविन कोंबडि मिळणार आहे का? म्हणुनच व्हेज अन्नात हिंसा कमी असते. आणि निर्मीती जास्त असते. अगदी काहि रोगांवर देखिल गव्हचे सत्व वापरतात.
३)तुम्ही ज्या क्षणी प्राणी/पक्षी मारता त्या क्षणी "विघटन" सुरु होते. विघटन म्हणजे कुजणे-सडणे. आता विघटन हि फारच नैसर्गीक क्रीया आहे. काहिवेळा तर ’-५’ टेंप्रेचर मध्ये देखिल अतिशय संथ पध्दतीने विघटन चालु असतेच असते. ’-५’ मध्ये जगु शकणारे जंतु असतात. त्यामुळे ते सुगुना चिकन असो किंवा दुर्गुना चिकन असो, स्वच्छ वगैरे असत नाहि. तसे भाजीचे नसते. भाजी जोवर सतत ओली होत नाहि तोवर कुजत नाहि. म्हणजे भाजी जास्त स्वच्छ राहु शकते.
४)मासे कोणी २ दिवस एखाद्या खोलीत उघड्यावर ठेवले आहेत का(वाळवलेले किंवा सुकट/ड म्हणत नाहिये)? किंवा कोणी ठेवेल का? नाहि ना? आम्ही कोबी, मेथी, सीमला मिर्ची ४ दिवस ठेवतो. आणि त्याचा वासहि येत नाहि. कदाचित ती सुकतील पण त्यांच्या वासाने घरात थांबवत नाहिये असं कधी होत नाहि(भाजी "कुजली तर? चा प्रश्न वेगळा आहे, खोलीत ठेवलेली भाजी जर पातळ कपड्याने झाकुन ठेवली(जेणेकरुन स्वच्छ राहिल पण दमट होणार नाहि) तर भाजी ४-५ दिवस सहज टिकते.)
५)मांसाला स्वत:ची अशी फारच कमी चव असते. म्हणजे कोंबडि आणि बदक किंवा बोकड आणि ससा यांच्या मांसात चव वेगळी असेलहि, असायलाहि हवी(नाहितर फायदा काय?) ते चावण्यासाठि देखिल वेगळे कष्ट घ्यावे लागत असतील(मऊ/वातड). पण "बघा कोंबडी कशी तिखट आहे आणि बदक असे आंबट आहे, मात्र अजुन थोडे मोठे झाले असते तर मात्र गोड लागले असत हं!" असे कोणीहि मांसाहारी म्हणु शकत नाहि. व्हेज वाले हे नक्किच म्हणु शकतात.
६)वनस्पतींना खाउन "प्लांट-गुनिया" होत नाहि . काहि वनस्पती विषारी असतात पण त्यांचा वापर आपण भाजीत करतच नाहि. हांऽऽ आता मी धोतर्याचेच बी खाणार असं कोणी म्हणालं तर मात्र काहि इलाज नाहि.
७)कढिपत्ता जरी सुकला तरी त्याला १० मिनिटे पाण्यात टाकले कि परत हिरवट होतो, बरं चवहि तीच राहते. मांसाहाराचं असं असतं का?
८)कच्च मांस तुम्ही खाऊ शकता का?(खाऊन दाखवु का? हा मुद्दा नाहिये मी म्हणिन तेव्हा आणि ते खायच मग बड्याचं आणि छोट्याच हा फरक नकोय) पण आम्ही कच्चे कोबी, सिमला मिर्ची, खातो. आजकाल तर चायनीज मध्ये या कच्च्या भाज्यां शिवाय पानहि हलत नाहि.
९)मांसाहारात किती प्रकारच्या चवी देउ शकता? गोड मासे, तुरट कोंबडि आणि कडु बोकड असे कोणी ऐकले अथवा खाल्ले आहे का? नाहि ना? आम्ही मात्र देऊ/खाऊ शकतो.
१०)जेव्हा मांसाहारात variety असते लोकं म्हणतात तेव्हा, शाकाहारात त्याच्या १०० पट जास्त variety आहे हे विसरतात का? इतकिच चव डेव्हलप करायची असेल तर व्हेज पदार्थ जगातल्या सगळ्या चवी देऊ शकतात.
गोड(साखर-गुळ-फळे), आंबट(आमचुर, आमसुल, लिंबु), तिखट(अर्थात मीरची), तुरट(आवळ्याचे लोणचे,/ढेणसे(टॉमेटो सारखा प्रकार)), कडु(कारले,मेथी), जळजळीत(लवंग, काळी मिरी), पांचट(गवार, भोपळा), जळकट(बटाट्याच्या भाजीची खरपुंडि), उग्र(लसुण, कांदा), खरपुस वगैरे वगैरे. या शिवाय - कोबी, कोथिंबीर,शेपुची भाजी या कोणत्या चवीत बसतात हा संशोधनाचा मुद्दा आहे(आणि ते संशोधन दुसर्याने करावे, मला भोपळा आणि या तीन गोष्टि अज्जिबात आवडत नाहित!! )
तिखट, जळजळित किंवा जळकट चवी शि्वाय अजुन कोणत्या चवी मांसाहार देऊ शकतो?????
सांगण्याचा मुद्दा इतकाच. आपल्या एखाद्या रविवारची सुट्टि एखाद्या कोंबडिची कायमची सुट्टि तर करत नाहि ना? याचा विचार व्हावा.
12 comments:
शाकाहार घेण्याच्या मागे असलेली कारणे खरी आहेत.
(मीही शाकाहारीच आहे).
जाता जाता आणखी एक कधीमधी माझ्या डोक्यात येणारा विचार सांगते - कुठेतरी वाचले आहे की ’सात्विक अन्न’ म्हणजे सात्विक पध्द्तीने बनवलेले अन्न, आयुर्वेदात म्ह्ट्ल्याप्रमाणे ते भक्षण केल्याने सात्विकपणा आचरणात येतो. तसे जर मांसाहाराचा विचार केला तर मला असे नेहमी वाटते की मांसाहार घेणारयाच्या वृत्तीत कुठेतरी तो हिंसक गुण उतरत असावा. (हे माझे वयक्तिक सर्वसाधारण निरीक्षण आहे.)
तुझि शाकाहार आणि मांसाहार याच्या व्याख्येत गल्लत झालेली जाणवते, कमीत कमी जे कहि तु उदाहरणा दाखल लिहिले आहेस त्या वरुन तरि तसेच वाटते.मला एक गोश्ट सांग, जर दोहोंची शिजवण्याची,साठवण्याची पध्धत,सगळं काहि सारखेच असते तर veg हे veg अणि non veg हे non veg अस्ते का? सगळे सारखेच नसते का?
मी,
अगं मुली शाकाहार हा मांसाहारापेक्षा चांगला का? हे मला सांगायचय. शाकाहार हा स्वच्छता, साठवण, शिजवणे या गोष्टित केव्हाहि उजवा आहे. आणि पध्द्त वेगळी आहे म्हणण्यापेक्षा मांसाहारात बर्याच "मर्यादा" आहेत म्हणुन त्याला वेगळे साठवा, वेगळे शिजवा असले प्रकार करावे लागतात.
आणि दुसर्या विषयानुरुप(अध्यात्म) विचार करता देखिल शाकाहारालच जास्त महत्व दिले आहे. आणि हि गोष्ट सांगणारे कोणी आंडु-पांडु नव्हते/नाहित. पण सगळ्यांचाच देव-अध्यत्म यांवर विश्वास असेलच असे नाहि. म्हणुन तो मुद्दा मांडलाच नाहिये, शिवाय त्यातला मी अधिकारी पुरुष देखिल नाहिये.
अजुन एक गोष्ट काहि लोकं आचरट स्टेट्मेंट देखिल करतात कि मांसाहाराने ताकद वाढते, अंगात शुरता येते वगैरे वगैरे पण त्या हिशोबाने हत्ती,जिराफ, पाणघोडे, गवे हे प्राणी मांसाहारी असायला हवेत ना? मुळात युध्द किंवा तत्सम ठिकाणी तुम्हाला रक्त, तडफाड पहायची सवय असावी जेणे करुन तामसी वृत्ती वाढेल ह्या दृष्टिने मांसाहार योग्य सांगितला गेला आहे. बाकि काहि नाहि.
http://www.orkut.co.in/CommMsgs.aspx?cmm=5821778&tid=5231660965640215753&na=1&nst=1
Pradnya
Masahar ha chavisathi nahi tar nutrition sathi khalla jato. Especially thandichya pradeshat. Mi swata shakahari ahe.
मी स्वतः शाकाहारी आहे.
पण तू म्हणतोस की, धान्य खाताना हत्या होत नाही हे चुक आहे.
धान्यात नविन जीव (रोप, झाड़) निर्माण करायची क्षमता असते.
तसेच, कोथिम्बिर, पालक अश्या भाज्या तर जिवंत तेलात परतल्या जातात,
हे कोम्बडी शिजवण्यापेक्श भयंकर नाही का?
माझ्या दृष्टीने फलाहार (तो पण बिया बाजूला काढून) हा खरा शुद्ध "अहिन्सहार" आहे.
फलाहारत फलाभाज्य पण धराव्यत (बी काढून ती पेरणे महत्वाचे, नाहीतर हत्या निश्चित आहे)
मी स्वतः शाकाहारी आहे.
पण तू म्हणतोस की, धान्य खाताना हत्या होत नाही हे चुक आहे.
धान्यात नविन जीव (रोप, झाड़) निर्माण करायची क्षमता असते.
तसेच, कोथिम्बिर, पालक अश्या भाज्या तर जिवंत तेलात परतल्या जातात,
हे कोम्बडी शिजवण्यापेक्श भयंकर नाही का?
माझ्या दृष्टीने फलाहार (तो पण बिया बाजूला काढून) हा खरा शुद्ध "अहिन्सहार" आहे.
फलाहारत फलाभाज्य पण धराव्यत (बी काढून ती पेरणे महत्वाचे, नाहीतर हत्या निश्चित आहे)
जीवो जीवस्य जीवनम
हे तत्वच सरते शेवटी जगात अंतीम आहे.
मांसाहार हा गरज नसताना किंचा कुठलाही आहार हा गरज नसताना फक्त चोचले पुरविण्यासाठी करु नये असेच आपल्या संस्कृतिचे मर्म आहे. जर समुद्रकाठी तुम्हाला मुबलक अन्न धान्य पिकवता येतच नसेल तर माणसाने मासे खाणे अयोग्य होणारच नाही कारण तो त्याच्या अधिवासात पोटाकरता पोटापुरतेच घेत आहे. अंटार्टिका मधील लोकानी भाजी कुठून आणायची ? हा प्रश्न आहेच ..
पण समजा तो मावळात राहत आहे त्याला शेती करणं शक्य आहे आणि तो जर मांसाहार करत असेल तर माझ्या दृष्टीने तो हिसाचार ठरेल ..
मी स्वत: शाकाहारी आहे. मला तुझी कारणे आणि त्याचे विश्लेशण ही आवडले पण तो एक द्रुष्टीकोन असू शकतो.
"मी स्वतः शाकाहारी आहे.पण तू म्हणतोस की, धान्य खाताना हत्या होत नाही हे चुक आहे.
धान्यात नविन जीव (रोप, झाड़) निर्माण करायची क्षमता असते.तसेच, कोथिम्बिर, पालक अश्या भाज्या तर जिवंत तेलात परतल्या जातात,
हे कोम्बडी शिजवण्यापेक्श भयंकर नाही का?
माझ्या दृष्टीने फलाहार (तो पण बिया बाजूला काढून) हा खरा शुद्ध "अहिन्सहार" आहे.
फलाहारत फलाभाज्य पण धराव्यत (बी काढून ती पेरणे महत्वाचे, नाहीतर हत्या निश्चित आहे)"
-------
मित्रा,
मी शाकाहारात हिंसा होत नाहि असं कुठे म्हणालोय? मी ती कमीत-कमी होते असे म्हणालो.
आणि मांसाहारापेक्षा तर नक्किच. आणि तु परत तेच सांगतो आहेस जे मी म्हणालोय, अरे पुनर्निर्माण करायच्या क्षमतेमुळेच शाकाहार श्रेष्ठ आहे.
विरेन्द्र,
मी तेच म्हनातोय कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्र्श्न आहे. फक्त जास्त चांगला आहार कोणाता तर तो म्हणजे शाकाहार असं माझ मत आहे.
आणि जिथे इलाजच नाहि तिथे माणुसहि खायला हरकत नाहि.[:p].
How will you counter the point that meat has protein that veg. might lack. I am no expert. I am just putting forth a point that I heard from some non-veg people.
"How will you counter the point that meat has protein that veg. might lack. I am no expert. I am just putting forth a point that I heard from some non-veg people."
-
सोयाबीन, उडिद, आणि अजुन अनेक डाळी यांच्यात भरपुर प्रोटिन्स असतात. बघा एक्सपर्टना विचारुन!
Post a Comment