Tuesday, August 12, 2008

कॅलेंडर - ५७ ते ४७

प्रत्येक भारतीयाच्या घरात हे कॅलेंडर लागावे अशी इच्छा. मी सध्या १८५७ ते १९४७ या दरम्यान "क्रांतिकारकांनी" जे "सशस्त्र क्रांतीचे" प्रयत्न केले त्याचा मागोवा तारखे नुसार घेतला आहे. ज्यांना क्रांतिकारकांशी संबधीत(जन्म-मृत्यु-कार्य) अश्या घटना माहित असतील तर त्यांनी मला ती माहिती द्यावी.जानेवारी.
२ - १)हुतात्मा विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल पुण्यतिथी(१९४३). २)हुतात्मा हिराजी पाटिल पुण्यतिथी.फेब्रुवारी.
३ - क्रांतिसूर्य उमाजी नाईक पुण्यतिथी(१८३४).

१७ - आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी(१८८३).

२६ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आत्मार्पण दिन(१९६६).

२७ - चंद्रशेखर आझाद पुण्यतिथी.

मार्च
२३ - भगतसिंग-राजगुरु-सुखदेव पुण्यतिथी (१९३१).


एप्रिल
१९ - अनंत कान्हेरे पुण्यतिथी(१९१०).

१८ - १)सेनापती तात्या टोपे पुण्यतिथी(१८५९). २)दामोदर हरी चापेकर पुण्यतिथी(१८९८).

३० - खुदिराम बोस यांनी मुझफ्फरपुरमध्ये किंग्जफोर्डच्या बग्गीवर बॉम्ब टाकला(१९०८).

मे.
१ - हुतात्मा विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल जयंती(१९१२).

८ - वासुदेव हरी चापेकर पुण्यतिथी(१८९९).

१० - १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची सुरुवात.

१२ - बाळकृष्ण हरी चापेकर पुण्यतिथी(१८९९).

२८ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती(१८८३).जुन
१८ - राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी(१८५८).

२२ - आयस्टर व रॅंड वध(१८९७)(चापेकर बंधु). वीर सावरकर व नेताजी बोस भेट(सावरकर सदन, मुंबई, १९४१)

२५ - दामोदर हरी चापेकर जयंती(१८६९).

जुलै
१ - कर्झन वायली वध(१९०८)(मदनलाल धिंग्रा)

८ - मार्सेलिस इथुन वीर सावरकरांचा निसटण्याचा प्रयत्न(१९१०).

२३ - १)लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती. २)चंद्रशेखर आझाद जयंती.

ऑगस्ट
१ - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी(१९२०)

१८ - खुदिराम बोस पुण्यतिथी(१९०८)

३ - क्रांतिसिंह नाना पाटिल जयंती(१९००).

सप्टेंबर.


ऑक्टोबर.
२१ - राणी लक्श्मीबाई जयंती(१८३५).

नोव्हेंबर.
४ - आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जयंती(१८४५).

१२ - सेनापती बापट जयंती(१८८०).

१६ - विष्णू गणेश पिंगळे पुण्यतिथी(१९१५).

२८ - सेनापती बापट पुण्यतिथी(१९६७).

डिसेंबर.
६ - क्रांतिसिंह नाना पाटिल पुण्यतिथी(१९७६).

१७ - सॉंडर्स वध(१९२८)(भगतसिंग-राजगुरु-आझाद).

२१ - जॅक्सन वध(१९०९)(अनंत कान्हेरे).

4 comments:

अनिकेत भानु said...

सशस्त्र क्रांतिकारकांच्या कॅलेंडरात टिळकांचे नाव का बरे....

Anand Sarolkar said...

Mala je vicharaycha hota te Aniket ne already vicharla ahe...so I second his question

saurabh V said...

लोकमान्यांचे क्रांतिकारकांशी खुप जवळाचे संबध होते हे "ओपन सिक्रेट" आहे!

खुदिराम बोस यांनी मुझफ्फर्पुरात जे स्फोट घडवले त्यावेळी टिळकांवर दाट संशय होता.

अनेक क्रांतिकारकांना भुमिगत होण्यात अथवा वीर सावरकरांसारख्या जहाल क्रांतिकारकांना शिक्षणात मदत करीत पण खरी मदत कसली होती हे आपण जाणातोच.

अनिकेत भानु said...

साहेब...तुम्हाला सामाजिक खो दिलाय.. :)