Thursday, September 11, 2008

आठवण....

आठवते का? आकाशावर उमटुन गेली होती लाली,
आठवतो का? तोच रक्तीमा फुलला होता तुझ्याच गाली. - १

आठवले का? हळवे स्पर्श, नीसटती त्यांची हुरहुर,
आठवली का? उशीर होता लटक्या रागाची कुरबुर. - २

आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद,
आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३

आठवली का? अधीर वचने अधराची अधराला,
आठवले का? चुकार अश्रु बिलगते पदराला. - ४

आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली,
आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५

- सौरभ वैशंपायन(मुंबई).

3 comments:

Anand Sarolkar said...

Surekh! mast jhali ahe kavita...shevatchi line khupach khas.

प्रशांत said...

सौरभ,
मस्त कविता. विशेषतः तिसरं आणि शेवटचं कडवं फारच सुरेख.

साखळी हायकूसाठी खॊ दिलाय बघ.

-प्रशांत

प्रशांत said...
This comment has been removed by the author.