Tuesday, September 21, 2010

बुध्द !



जगलो काल पावतो, जणू अनिरुध्द मी,
जोर ना चाले कुणाचा, ना कुणाशी बध्द मी.
बांधिल मी माझ्या मनाला, अंतरातील युध्द मी,
संगराच्या मध्यभागी, शांत निजला बुध्द मी ॥१॥



वज्र अस्थिपंजराचे, दान देण्या सिध्द मी
तोडती लचके गिधाडे, ना तरीहि क्रुध्द मी,
सोहळे ना सोवळ्याचे, निष्कलंक शुध्द मी,
संगराच्या मध्यभागी, शांत निजला बुध्द मी ॥२॥

- सौरभ वैशंपायन.

9 comments:

दीपक परुळेकर said...

Awesome !!
Simply great!!

Keep it up !!

Saurabh said...

Thank you deepak!

[:-)]

BinaryBandya™ said...

apratim...

Anonymous said...

कोणी स्वतःला कविता लिहिण्यासाठी एवढे का ओढावे? यमक जमला म्हणजे कविता नाही होत. ती आतून यावी लागते. तुझे लेख कसे आतून आल्यासारखे वाटतात. कविता कोणा एका तुझ्या मनातल्या काल्पनिक सौरभने लिहिली आहे असा भास होतो. तू तो सौरभ नाही आहेस लक्षात घे. हा कॉमेंट फक्त भा पो होता please delete कर.

Saurabh said...

@ Anonymous ,

नाही, कमेंट डिलिट करण्याची गरज वाटत नाही. माझी मांडलेली प्रत्येक गोष्ट सगळ्यांना आवडेलच असं नाही, आवडावी असा हट्ट नाही व कोणाला आवडली नाही तरी त्यात मला अजुन सुधार करण्याची गरज आहे ह्याची जाणीव रहाते जी माझ्यासाठी चांगलीच आहे.

BTW माझे लेख आवडतात त्याबद्दल धन्यवाद! [:-)]

नरेंद्र गोळे said...

सौरभ,

ही कविता खरोखरीच सुंदर आहे.

मात्र, स्वतःबद्दल तू लिहीलेले शब्द ही तुझी कविता नाही. ती माझी "बेरंग" नावाची कविता आहे.

मात्र, ती तुला स्वतःची ओळख करून देणारी वाटावी, यावरून आपण दोघेही परस्परांचे "birds of same feathers" असल्याचे सिद्ध होते.

मागे एकदा माझी हीच कविता कुणीतरी विकीवर कुसुमाग्रजांची म्हणून लिहीली होती. तेव्हाही जो वाद मनोगतावर झाला होता, तो कदाचित आजही तिथे सापडू शकेल. मात्र, माझी कविता कुसुमाग्रजांची वाटू शकते हे पाहून मलाच खूप बरे वाटले होते.

असो. तुझी अनुदिनी स्टार माझाने उल्लेखनीय ठरवल्याखातर मनःपूर्वक अभिनंदन!

चित्पावन आणि परशुराम यांच्यावरील संकलन मला सुंदर वाटले.

स्नेहाभिलाषी
नरेंद्र गोळे

Saurabh said...

नरेंद्रजी,

सर्वप्रथम माझी कविता आवडली हे ऐकुन बरे वाटले.

आणि खरच ती कविता कुसुमाग्रजांची आहे असच माझ्याहीपर्यंत पोहोचले होते. आपण अतिशय उत्तम कविता केली आहे. आजवर अजाणापणे ती वापरली या बद्दल क्षमस्व.

परत माझा ब्लॉग व त्यातले चित्पावनांविषयी लिहीलेला लेख आवडले म्हणून धन्यवाद!!

AJ said...

aprateem! khup awadli hi kavita.

अहिर भैरव said...

सौरभ मित्रा तु दैवी लेखणीचा धनी आहेस। खरच खुप छान