कधी कधी विचारांच चक्र चालु होतं, विनाकारणच काही विचार डोक्यात घर करुन राहतात. मग डोक्यात विचारांची गर्दि होते आणि मुंबईच्या ट्रेन मधल्या माणसांसारखे ते बाहेर सुद्धा लटकु लागतात. मग अश्या बिचार्या विचारांना घर असावं म्हणुनच हा प्रपंच. फारसं काही सांगायच-लिहायचं नाहिये, तसंच मी लिहिन-बोलेन-सांगेन ते सगळ्यांना पटलचं पाहिजे असाही हट्ट नाहिये. हे माझे विचार आहेत, कोण्या एका क्षणी मला सहज सुचलेले ...... अगदि सहज!!!
Saturday, January 14, 2012
"गुरुदक्षिणा"
पण माझ्या दृष्टीने पानिपतावरती झालेला पराभव हा खरा पराभव नाही. कारण १८व्या शतकाच्या शेवटि तब्बल १४ वर्ष लाल किल्यावरती "भगवा" फडकत होता हा इतिहास आहे. मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे जर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे. महादजी शिंद्यांनी एकेका रजपुताला सुटा करुन करुन पिदवला हा खरा इतिहास आहे, "गढ मै गढ चित्तोड गड बाकि सब गढियॉ।" म्हणून लैकिक मिळवलेला किल्ला जवळपास वर्षभर लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर ’महान’ सम्राट अकबराला मिळाला होता ..... मराठ्यांनी बोल - बोल म्हणता तो १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे. नजिबाचा नातू अली गोहर याने बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून मराठ्यांनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ ३ दिवस टांगून ठेवला होता हा खरा इतिहास आहे. पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर मराठ्यांनी सुरुंग लावून उडवून दिली हा खरा इतिहास आहे..
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
great article Saurabh... got goosebumps ...
Post a Comment