Tuesday, March 27, 2012

उत्तर

गर्भरेशमी वस्त्र त्यावरी,
काठ जरीचे सळसळते,
वेळ एकटि अबोल साजण
चुकार कंकण हळहळते ॥१॥

अबोल साजण अबोल हसता
हुरहुरते पाऊल वळते
मी सांगावे तू ऐकावे
शब्दाविण खूण कळते ॥२॥

अता उरावे अता सरावे
दिव्यातले अत्तर जळते,
मिणमिण मिटते ज्योत लाजरी
 एक क्षण नजर मिळते ॥३॥

हळूच यावे मिठीत घ्यावे,
स्पर्शास बावळे मन चळते
असा दुरावा कसा उरावा?
मिठीतलेही अंतर छळते ॥४॥

रातराणीचा गंध मनावर
तनावरती दव गळते
फुले अवेळिच पारीजात का?
प्रश्नाविण उत्तर मिळते.॥५॥

- सौरभ वैशंपायन.

5 comments:

Suhas Diwakar Zele said...

व्वा व्वा...!!

हळूच यावे मिठीत घ्यावे,
स्पर्शास बावळे मन चळते
असा दुरावा कसा उरावा?
मिठीतलेही अंतर छळते

एकदम सुंदर :) :)

Anonymous said...

नाही, नाही जमली, आतून नाही आलीये.
"फाळणी" सारखी कविता लिहिणार तू, असा क ला क आणि ध ला ध जुळवायच्या फंदात का पडतोस? स्वच्छंद लिही की.

saurabh V said...

@ anonymous,

:-/ aho Manapsun lihili ahe kavita.

क ला क आणि ध ला ध nahi kelay.

tari ajun changali kavita lihiNyacha prayatn karen.

Anonymous said...

Hey great man.... awesome...:-)

Unknown said...

Chhan lihiliyes kavita saurabh. aavadli mala