आयुष्यात प्रथमच लहान मुलांसाठी काहीतरी लिहीलंय. कविता सुचताना मजा वाटली, पण एकंदर कठिण काम होतं. लहान लहान ८-१० शब्दांचीच कडवी करा, त्यातच यमक बसवा. बोजड शब्द नकोत. त्यात गोष्ट असायला हवी. मोठ्यांच्या दृष्टिने कविता कितीही निरर्थक असली तरी लहान मुलांना मजा वाटून ते त्यांच्या डोळ्यांसमोर उभं रहायला हवं. हे इतकं सांभाळताना मुख्य गोष्ट मात्र पूर्ण बोंबलली, ती म्हणजे लहान मुलांसाठी असल्याने जास्तीत जास्त ५-७ कडव्यांत कविता संपायला हवी होती. माझी एक मैत्रिण म्हणाली "कविता मजेदार आहे, पण लहान मुलांसाठी तू जवळपास "खंड-काव्य" लिहीलं आहेस!" :-D :-D ..... तसं तिच्या म्हणण्यातलं तथ्य मान्य करायला हवं कारण मुलांना एका जागी इतका वेळ बसवत नाही. मात्र तरीसुद्धा ही कविता इतरांना वाचायला द्याविशी वाटली. लहान मुलांच्या एखाद्या कार्यक्रमात कवितेतून गोष्ट म्हणून मात्र ही सादर करता येईल १० मिनीटांची काव्य - नाटुकली टाईप काहीतरी निघू शकेल यातून. :-p
===========
हिरवे नावाचे,
कोरडे गाव,
गावात होता,
पाण्याला भाव.
गावात होता,
हुशार वाणी,
धान्या बरोबर,
विके पाणी.
जमवली त्याने,
भरपुर नाणी,
मुलगी त्याची,
सुंदर शहाणी.
मुलीचं म्हणे,
करीन लग्न,
सुखी संसारात,
होईल मग्न.
पण .....
बबलू टबलू,
गाव-गुंड,
ताडमाड उंच,
चाल थंड.
बबलू बारीक,
टबलू लठ्ठ,
डोक्याने पण,
दोघे मठ्ठ.
बबलू टबलू,
दाणगट फार,
करती चोरी,
देती मार.
बबलू टबलू,
घरात आले,
वाण्याचे सगळे,
पैसे नेले,
वाण्याला लागली,
खूप मोठी चिंता,
मुलीचे लग्न,
कसे होईल आता?
कोण पैसे,
परत आणेल?
बबलू टबलूला,
फटके हाणेल?
गावातला पिंट्या,
कवि - गायक,
लोकांना वाटे,
त्रासदायक.
कविता करी,
फार टुकार,
लोक म्हणती,
बेकार बेकार.
आवाज त्याचा,
खूप भसाडा,
काचा फुटती,
जाऊन तडा.
वाण्याला सुचली,
मोठी युक्ति,
गुंडांपासून,
मिळेल मुक्ति.
पिंटूला बोलावुन,
केला प्लॅन,
पिंटू बसला,
लावून ध्यान.
वाणी गेला,
बबलूकडे,
पैज लावली,
सोन्याचे कडे.
पैज होती,
भलतीच धीट,
पिंटूच्या कविता,
ऐकायच्या नीट.
बबलू गेला,
पिंटूसमोर,
कवितेला म्हणे,
देईन वन्समोअर.
कविता ऐकुन,
मोजुन पाच,
बबलू झाला वेडा,
करु लागला नाच.
टबलूला ह्याचा,
आला राग,
हिरवे गावात,
भागमभाग.
पिंटुची त्याने,
पकडली मान,
पिंटुने घेतली,
मोठी तान.
टबलूचे फुटले,
दोन्ही कान,
कानात बोटे,
सोडली मान.
बबलू टबलू,
दोघे मिळुन,
गावाबाहेर,
गेले पळुन.
- सौरभ वैशंपायन
===========
हिरवे नावाचे,
कोरडे गाव,
गावात होता,
पाण्याला भाव.
गावात होता,
हुशार वाणी,
धान्या बरोबर,
विके पाणी.
जमवली त्याने,
भरपुर नाणी,
मुलगी त्याची,
सुंदर शहाणी.
मुलीचं म्हणे,
करीन लग्न,
सुखी संसारात,
होईल मग्न.
पण .....
बबलू टबलू,
गाव-गुंड,
ताडमाड उंच,
चाल थंड.
बबलू बारीक,
टबलू लठ्ठ,
डोक्याने पण,
दोघे मठ्ठ.
बबलू टबलू,
दाणगट फार,
करती चोरी,
देती मार.
बबलू टबलू,
घरात आले,
वाण्याचे सगळे,
पैसे नेले,
वाण्याला लागली,
खूप मोठी चिंता,
मुलीचे लग्न,
कसे होईल आता?
कोण पैसे,
परत आणेल?
बबलू टबलूला,
फटके हाणेल?
गावातला पिंट्या,
कवि - गायक,
लोकांना वाटे,
त्रासदायक.
कविता करी,
फार टुकार,
लोक म्हणती,
बेकार बेकार.
आवाज त्याचा,
खूप भसाडा,
काचा फुटती,
जाऊन तडा.
वाण्याला सुचली,
मोठी युक्ति,
गुंडांपासून,
मिळेल मुक्ति.
पिंटूला बोलावुन,
केला प्लॅन,
पिंटू बसला,
लावून ध्यान.
वाणी गेला,
बबलूकडे,
पैज लावली,
सोन्याचे कडे.
पैज होती,
भलतीच धीट,
पिंटूच्या कविता,
ऐकायच्या नीट.
बबलू गेला,
पिंटूसमोर,
कवितेला म्हणे,
देईन वन्समोअर.
कविता ऐकुन,
मोजुन पाच,
बबलू झाला वेडा,
करु लागला नाच.
टबलूला ह्याचा,
आला राग,
हिरवे गावात,
भागमभाग.
पिंटुची त्याने,
पकडली मान,
पिंटुने घेतली,
मोठी तान.
टबलूचे फुटले,
दोन्ही कान,
कानात बोटे,
सोडली मान.
बबलू टबलू,
दोघे मिळुन,
गावाबाहेर,
गेले पळुन.
- सौरभ वैशंपायन
3 comments:
पिंटू मास्टर, कविता जमली आहे या वेळेस. छान छान.
कविता छान झाली आहे फक्त वाणी, सोन्याचे कडे असे शब्द हल्लीच्या मुलांना ठाऊक असतील का असा प्रश्न पडला.
chanch aahe kavita
Post a Comment