Friday, July 23, 2021

वैकुंठाचा राजा


वैकुंठाचा राजा त्याचे खेळच वेगळे,
एका विटेवरी नांदे पहा वैकुंठ सगळे।

वैकुंठाचा राजा जात्यावरी धान दळे,
जनीच्या ओवीतून ऐके कौतुक आगळे।

वैकुंठाचा राजा पण मुलाखाचा विसराळू,
भक्तापायी घर विसरे भावभुकेला मायाळू।

वैकुंठाचा राजा कोण दुजा असा कृपाळू,
योगीयांचा राणा करी ब्रह्मविद्येचा सुकाळू।

वैकुंठाचा राजा बघा महालक्ष्मी पाय चुरे, 
भक्ताच्या शब्दापायी त्याला एक वीट पुरे।

 - सौरभ वैशंपायन

No comments: