Monday, June 15, 2009

सोहळा

काजळ उधार मागावे, तुला आभाळाने आज
अन सोबत मागावी, तुझ्या कटाक्षाची वीज - १

मग अधीर थेंबांनी, तुझी मोहरावी कळी,
एक अवखळ बट, अन गालावर खळी - २

ओला आसमंत सारा, ओला मातीचा सुवास,
ओली ओठांची पाकळी, ओले मोकळाले केस - ३

अशी कडाडावी वीज, उरामध्ये झंझावात,
ओले गौर तनु तुझे, ओघळावे अंतरात - ४

सये असा उतरावा, तुझ्या रुपाचा सोहळा,
आणि कोसळुन जावा, नवा पाऊस हळवा - ५

- सौरभ वैशंपायन.

9 comments:

Anonymous said...

way better than other so called poets on blogger and orkut

me said...

hmmmm.......... ;)

Seeker of life!!! said...

Ayushyatli vachleli sarvat sundar kavita...

Makarand MK said...

अरे काय भन्नाट लिहितोस तू! मी वेधसचा मित्र आहे coep मधला.
त्याच्या list मध्ये तुला पाहिलं आणि इथे आलो. तू "तव नयनांचे दल" (कवी - बा भ बोरकर) वाचली /ऐकली आहेस का? अगदी तसंच वाटलं तुझी कविता वाचून!
असो. तू काय करतोस? मी IIT Mumbai मध्ये आहे! http://kavitabhavlelya.blogspot.com/2009/01/blog-post_28.html

saurabh V said...

at anonymous


thanx! [:-)]

@ me

thanx Dear!

saurabh V said...

@ Seeker Of life

Thank You very Much!!!

IMP comment for me![:-)]

saurabh V said...

@ Makarand,

Thank You!
नाही बोरकरांची ती कविता नाही ऐकलीये अजुन. पण आवडेल. मी सध्या CCNA ची तयारी करतो आहे.

saurabh V said...

मकरंद,


वा!!!!!!!!!!! मित्रा बोरकरांची कविता वाचुन वेड लागायच बाकी आहे!!! सही, सही सही आहे . धन्यवाद!

Dk said...

sahiiiiiiiiiiiiiiiiii

:D:D:D