Friday, September 25, 2009

चातक

खरं तर हि कविता म्हणजे नाल होती म्हणुन घोडा विकत घेतला असा प्रकार आहे. खरं तर या कवितेच्या पुढे काहितरी इंजिन लाव अशी पिन श्री श्री ओंकारबुआ घैसास यांनी टोचल्याने हि कविता लिहिलीये.


------------------------------

आभाळ भरले ढगांनी, वेडा चातकहि झुरे
मौन सोड जरा बोल, राग लटका हा पुरे ॥धृ॥


आधीच उशीराने येणे, आणि लगबग जाणे
तुझे आणि पावसाचे, असे सारखे बहाणे
खेळ पाठशिवणीचा, तुझा-माझा आता पुरे,
असे ठेवुन तृषार्त, नाहि परतणे बरे - १


तश्या तहानेला माझ्या, काहि आदि - अंत नाहि,
त्यात भेटुन नेहमी, तुझी निघण्याची घाई,
कुणा हवे इंद्रधनु? कुणा हवे गार वारे?
फक्त सोबत रहा तू, येती आपसुक सारे - २- सौरभ वैशंपायन

7 comments:

क्रांति said...

surekh!

ओंकार घैसास said...

बर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

Prashant said...

आँ !
काय सुंदर लिहिलं आहेस....

आणि हे काय....
“...नाल होती म्हणुन घोडा विकत घेतला असा प्रकार आहे. खरं तर या कवितेच्या पुढे काहितरी इंजिन लाव...” अशी सुरवात वाचून असं वाटलं की झालं, काहितरी पांचटपणा असेल आणि एवढी झकास कविता.
मला वाटतं एवढीच असली तर उत्तम!

वा वा!

Abhijeet said...

lai bhari

प्रशांत said...

मस्त जमलीये कविता! :)

seeya said...

khupach chaan kavita..
in the begining i felt it will be unusual when i read:
खरं तर हि कविता म्हणजे नाल होती म्हणुन घोडा विकत घेतला असा प्रकार आहे. खरं तर या कवितेच्या पुढे काहितरी इंजिन लाव अशी पिन श्री श्री ओंकारबुआ घैसास यांनी टोचल्याने हि कविता लिहिलीये.

but it is a good one..
keep it up

Dk said...

hahaha sahi aahe hi :) aadhechee mala jaast aawdlee :)