मोजुन ७-८ महिन्यांपुर्वी माझ्या मित्रा बरोबर बोलणे चालु होते.... आत्ता स्टार माझा या मराठी न्युज चॅनेल पण तोच विषय घेउन "बातमी" देतयं. आज-काल ’चिमणी’ दिसत नाहिये. चिमणी न दिसणं ही काय न्युज होऊ शकते????????? तर हो! आपल्या दुर्दैवाने हो!!! ही "बातमी" व्हावी इतकी वाईट अवस्था आज आलीये.
जरा आपल्या आजुबाजुला बघा! चिमणी दिसतेय का ते? बघा - बघा! नाहि ना? मोठ्या तोर्याने मी "आमची मुंबई" म्हणतो! पण आज आमच्या मुंबईत एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या चिमण्या देखिल दिसत नाहित हो!!!
माझ्याच गॅलरीने शेवटचा ’चिवचीवाट’ कधी ’ऐकला’ होता??? छे आठवतचं नाहि! बहुदा गेल्या वर्षी ८-१० चिमण्या "भांडत" होत्या. चार इकडे - चार तिकडे. तो इवलासा जीव अगदी जीव खाऊन भांडत होता, बहुदा "एरीया" वरुन ती "चीऊगीरी" चालु असावी. त्या आठ-दहा चिमण्यांनी अगदी कान किटेपर्यंत चीवचीवाट केला. मिनीटभरासाठी तर माझं टाळकं सरकलं होत. पण पुढल्याच क्षणी त्या सगळ्या भुर्रर्रर्रर्र उडुन गेल्या. त्या तश्या गेल्या नसत्या तर मीच त्यांना हुसकवणार होतो, शेवटी तो माझा "एरीया" होता यार! आपली पण काहि आहे की नाही? पण तेव्हा काय ठाऊक होतं? की वर्ष भरात मला "या चिमण्यांनो परत फिरा रे!" असं म्हणावं लागेल.
माझ्या लहानपणी मी एक घास चीऊ चा! एक घास काऊ चा! असं करत मम-मम केली होती. गोष्टितली चीऊ माझ्या डोक्यावरुन कित्येकदा भुर्रर्रर्रकन उडुन गेलीये. आपल्या बाळाला न्हाऊ-माखु घालणारी, तिट लावणारी मेणाच्या घरातली गरीब चीऊ आणि शेणाच्या घरातला लबाड काऊ माझं बालपण आनंदाचं बनवुन गेले आहेत. आणि आज शेजारच्या छोट्याश्या श्रावणीला चीऊ म्हणजे काय? काऊ कोण? हे फक्त पुस्तकात दाखवावं लागतंय. आई-बाबांचे मम्मा-पप्पा झाले आणि आमच्या "काऊ" ची "cow" झाली. डिस्कव्हरीने आम्हाला व्हेनेझुएला मधल्या कुठल्याश्या जंगलात काय चालतं हे घर बसल्या बघायची सोय केली पण समोरच्या झाडावर बसलेला कावळा आम्हाला दिसलाच नाहि. त्यात काय बघायचेय? रोजच तर दिसतो. पण आता तसं नाहिये. हल्ली पितृपक्षात आमचे पितर देखिल कावळ्यांची वाट बघतात म्हणे.
अहो पिंडाला शिवायला देखिल कावळा नसतो! आणि हे माझे नाहि "व्यंकटेश माडगुळकर" या रानवेड्या माणसाचे अनुभवाचे बोल आहेत. त्यांच्या आईच्या पिंडाला शिवायला कावळा आलाच नाहि, शेवटी एका गाई ने त्याला तोंड लावले. त्यांच्या आईचा आत्मा मुक्त झाला, पण एक कावळा नसावा? म्हणुन माझा आत्मा ते वाचताना तडफडत होता. आणि हा अनुभव गावातला आहे तो सुद्धा काहि दशकांपुर्वीचा आहे. तेव्हा जर हि अवस्था होती तर आता काय झालं असेल?
चिमण्या नाहिश्या का झाल्या? या प्रश्नाचं उत्तर शोधुन काढायला मी काहि पक्षीतज्ञ वगैरे नाहिये. पण कॉमन-सेन्स वापरला तर "अमर्याद शहरीकरण" हे आणि हे एकच मुळ कारण आहे. आम्ही बिबटे वस्तीत शिरले अशी बातमी वाचतो. पण मोजुन १० वर्षांपुर्वी ते घर त्यांचच होतं हे खुशाल विसरतो. बंगाल मधल्या सुंदरबनातले वाघ नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. फुलंपाखरं शोधुन सापडत नाहियेत. जिथे ट्रेक करताना नेहमी सोबत करणारे पिवळ्याधमक रंगाचे "कॉमन ग्रास" फुलपाखरु देखिल आजकाल दिसत नाहि, तेथे मग "कॉमन जेझेबलची" काय कथा? आणि "कॉमन" फुलपाखरांची हि कथा तर अनकॉमन फुलपाखंरानी काय करावं? माझं लहानपण कर्जत सारख्या छोट्याश्या गावात गेल्याने माझ्या लहानपणी मी फुलपाखरांच्या मागे धावलोय. कुठलं फुलपाखरु पकडु असा प्रश्न पडावा इतकी फुलपाखरं मी बघितली आहेत. एकदा बाबांनी समजावलं होतं - "बेटा फुलपाखराला असं पकडु नये! त्याचे पंख नाजुक असतात, पकडंलं की त्याच्या पंखातला जोर जातो मग ते मरुन जातं! उद्या कोणी तुझी हातपाय बांधुन तुला एखाद्या डब्यात बंद केले तर चालेल?" आणि मी फुलपाखरं पकडण सोडुन दिलं.
मी फुलपाखरं पकडणं बंद केलं पण आज जगभर काय चाललय? आम्हा माणसाच्या हलकट जातीनं सगळी वाट लावलीये. ओरबाडणार - ओरबाडणार म्हणजे किती?? देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणतात. पण १५ दिवसांपुर्वी युनो ने जो अहवाल सादर केला त्यात त्या काठीची चाहुल लागली आहे. "ग्लोबल वॉर्मिंग". सगळ्यांच्या पायाखालची जमिन सरकलीये. NatGeo वर "अर्थ डे!" साजरा केला जातोय. गो ग्रीन, सेव्ह वॉटर, सेव्ह मदर अर्थ, Recycling असले बोर्ड सगळीकडे झळकु लागले आहेत.
हे लिहिताना उगीच आतुन अपराधी असल्याचं वाटतयं. या सगळ्या सत्यानाशाला मी कुठे कारणीभुत आहे का? मी चुकुन किंवा कदाचित चलता है! असं म्हणुन कुठे प्लॅस्टिकची पिशवी फेकली नाहि ना? किंवा चुकुन फुलपाखराचा कोश असलेली फांदी ओरबाडली नाहि ना? आणि हा विचार सगळ्यांनी करायची वेळ आलिये आता. किंवा कदाचित ती टळुनहि गेली असेल! आता तरी जागे व्हा! आपल्या पुढच्या पिढ्यांना असं नको वाटायला कि माझ्या पणजी-पणजोबांनी तेव्हाचं थांबवलं असतं सगळ तर? आत्ता सगळीकडे हिरवंगार असतं. मुंबई नावचं शहर पाण्यात गेलं नसतं. अकाळी दुष्काळ पडला नसता. पाण्यावरुन शेजारच्या देशाशी युद्ध करावं लागलं नसतं. ओझोन-फ्रेंडली डि-ओडरंट, ए.सी, फ्रीज वापरले असते तर कदाचित ओझोनला भगदाडं पडली नसती आणि UV किरणांनी मला आज कॅन्सर झाला नसता.
आपल्या पुढच्या पिढ्यांच भवितव्य आपल्या हातात आहे. डोक्यावरुन पाणी कधीच निघुन गेलय! आमच्याच धुंदीत जगताना आम्ही विसरलो होतो - निसर्ग कधीच माफ करत नाहि. तुम्ही त्याला दहा वेळा खिजवलत तर तो फक्त एकदाच सुनामीची छोट्टीशी छालक दाखवतो. आता निसर्गाला शरण जाणं हा अखेरचा पर्याय वाचलाय! Now this is race against Time. wake up! go mad! make diffrence!
-सौरभ वैशंपायन.
7 comments:
kharach ki aapli ladki lahan panachi chiutaai khute harawli nahi,they say that all these mobile ranges hv taken them away,aaj manus chimani shivay jagato pan mobile shiway nahi,khup sundar lekh aahe,remembered old bachpan ke din.
Uttam lihila ahes!
मुंबईत असताना चिमण्या कमी दिसत होत्या हे खरं आहे रे पण इथे पुण्यात आल्यावर परत ब-यापैकी चिमण्या दिसायला लागल्यात. पुण्यात आल्यापासुन नेमाने मी रोज बाल्कनीमधे पक्ष्यांना काहीतरी खायला घालते, आता माझ्याकडे चिमण्या, कावळे, कबुतरं आणि बुलबुल आणि अजुन एक वेगळ्या प्रकारचा पक्षी येतो. मी त्यांच्याशी गप्पा मारते म्हणुन आई मला भरपुर ओरडते सुद्धा! :)
लहान असताना अलिबागला आमच्याकडे चिमण्या घरटी बांधायच्या, त्यांचा चिवचिवाट कधी कधी डोकं उठवायचा पण आपल्यावर विश्वास दाखवुन त्या आपल्या घरी राहताय्त हा देखिल आनंद होता!
चिमण्या त्यांच्या पिल्लांना उडायला शिकवतात तो भाग पाहण्यासारखा असतो!
तु छान लिहिलं आहेस, "चिऊगिरी" आवडलं...
माझे बाबा कायम म्हणतात, आपण त्या प्राणी-पक्ष्यांच्या घरात राहतॊय, त्यांना त्रास न देता- त्यांच्याबरॊबरच राहायला हवं!
लहान असताना सगळ्या गोष्टींमधली हिरोईन चिऊताई होती, ती ह्या संकटांना सुद्धा घाबरणार नाही.I am sure, ती ह्या नव्या बदलांना adapt होऊन लवकरच परत येईल! (अशी काहीतरी theory वाचली होती)
चिमण्या कमी होण्याच आणखी एक कारण म्हणजे मोबाइल फोन आहे माहित आहे का? रेंज नावच्या जाळ्यामुळे चिमण्या कमी होत आहेत..
आणी अरे ग्लॉबल वॉर्मींग आणी इतर दिन साजरे करतो आपण पण ते रोज साजरे होन महत्वाचं... १० एप्रिल रोजी राण्यांचा जन्मदिवस जोरदर साजरा झला... चेंबुर पासुन गोराई पर्यंत जाताना मी ८०० ते १००० (अतिशयोक्ती नाही) पोस्टरस बघितले... डोक फ़िरल होत रे... हे अश्य पध्द्तीने शुभेच्छया देण्या पेक्षा झाड लावा म्हणाव त्यांना किमान त्या पोस्टरांएवजी किमान १० झाड लावुन ती जगवण्याची शुभेच्छा त्या राण्यांना पण ४ दिवस जास्त जगवतील म्हणाव...
पण या लोकांना माणसांची किंमत नाही ते चिमण्यांचा विचार काय करणार?
www.shodhswatahacha.blogspot.com
...स्नेहा
Lekh chhan jamlay. Ya sandharbhat Anil Awchat yanche 'Srushit Goshit' he wachanyat ale. Tyani ya sagla (shaharikaran, lutaru sanskruti, pradushan) goshtinche parinam lahan mulana sangnyasakhya goshtimadhun sangitale ahet.
I do my bit for the environment in the course of my day-to-day life.
Pun he sagle kartana majhya lakshat yete ki mi ektich ahe. Itaranche reactions agadi "Paryavaranvadi aahes(?)" pasun "Changla aahe pun aaplyala jamat nahi"pasun tar "Har sagla murkahapana/ timepass aahe" ase astat.
Post a Comment