Saturday, April 12, 2008

अभिमन्यु!

औक्षहिण अठरा जमले, संगर करण्या रणी,
शंख ध्वनी-टण्कारांनी कल्लोळ उसळला क्षणी. - १

चतुरंगाच्या सेना उत्सुक झाल्या करण्या तांडव,
नभी ग्रह-गोलांचीच टक्कर तैसे कौरव-पांडव. - २

व्युह रचुनि सुसज्ज द्रोण कौरव सेनापती,
कसा करावा भेद तयाचा कुंठीत झाली मती. - ३

कसे करावे प्रत्युत्तर ते पार्थ येथे नसता?
तोच एक भेदिल व्युह हा सहजी हसता-हसता. - ४

तोच उठला बालक जैसा मृगेंद्र-शावक वनी,
बालक कैचा? पार्थपुत्र तडतडती सौदामिनी. - ५

द्यावी आज्ञा बालक वदला नमवुनि कोवळे शीर,
रुकार मिळता विंधीत व्युह बेभान दौडला वीर. - ६

सुटु लागले तीर सरसर, नयन पापणी लवता,
वर्षाव करीतसे कोण? अर्जुन तो येथे नव्हता! - ७

कोण असा हा वीर? उत्सुक कौरव सेना अशी,
उभा सुकुमार ठाकला सुर्य-शलाका जशी. - ८

शतकर्णी ध्वज उंच तयाचा, सुमित्र सारथी,
सुवर्णांकित चिलखतासवे, ऊभा महाभारती - ९


मातेच्या गर्भात शिकले ते मनी आठवे आज,
अभिमन्यु वीर धुरंधर, धावुन वाचवी लाज. - १०

-सौरभ वैशंपायन.

6 comments:

mandarhingne said...

Arre mitra .. kiti chaan aahe tujha blog ... ek ek vachnyasarkhe .. lakshat thevnyasarhe lihiles ... khup khup sahi aahe tujha blog ..

Me nivant vachen ani reply dein nakki ..

Mitra tujha mail id kalala tar bare hoeil ..

majha id : mandarhingne@gmail.com

Jaswandi said...

aaila zop lagali nasati tar Abhimanyu chakravyuhatun baherhi ala asata...

khup khup aswastha hoyla hota jenva jenva Abhimanyu baddal aikate-vachate!

kauravanchi hridaya kharach itaki dagadi hoti ka? Yuddhaat naati baghayachi nastat he manala pan apala kowala tarun putanya apala chakravyuh bhedun aat aalyawar tyala asa nirdaya pane marun kasa takata yeil re? Vichitra vatayala lagata nusta vichar karun!

mahabharatamadhala maza sarvat navadata bhag ahe ha!

me said...

saurabh chakrawyuhat talawarichi udhaniti asate na?

Sneha said...

... speechless
mahabharatatal udhya .. aani abhimanyucha mrutu.. karnacha vadh.. aadhi bhimacha pashu sarkh rakt pin... yaa goshti kharach.. asast karatat...


...Sneha (shodhswatahacha)

saurabh V said...

@ "me"

"saurabh chakrawyuhat talawarichi udhaniti asate na?"हो!
म्हणजे समोरची व्यक्ति ज्या शस्त्राने अव्हान देईल त्याच शस्त्राने युद्ध करायचे असा नियम असतो. घोडा अथवा रथ यांना देखिल "महाभारत" शस्त्राचाच दर्जा देतं. म्हणुनच घोडेस्वाराने घोडेस्वाराशीच आणि रथी योद्ध्याने दुसर्‍या रथी बरोबरच युद्ध करायचे असा नियम महाभारतात होता.

saurabh V said...

@ जास्वंदि.


त्याला अतीश्रमाने आनी जखमांनी ग्लानी आलि होती.
पण हे अतिश्रम-अतिश्रम म्हणाजे काय तर, महाभारत सांगतं की एकटा अभिमन्यु कर्ण,द्रोण,जयद्रथ,कृपाचार्य,सात्यकी,दुर्योधन, दु:शासन अश्या सगळ्यां बरोबर लढत होता. आणि मी चुकत नसेन तर यांच्याहि आधी त्याने २ राजांना यमसदनाला धाडले होते. जेव्हा तो कोणालाच आवरेनासा झाला तेव्हा त्यावर ३ बाजुंनी मारा केला, आणि लक्ष विचलीत झाल्याने तो जबर जखमी झाला. बेशुद्ध असतानाच जयद्रथाने त्याच्या छातीवर लाथ मारली आणि त्यावर गदेने देखिल प्रहार केला.

अभिमन्युच्या वीरगतीच्या वर्णनापेक्षाही अर्जुनाचा "विलाप" हा जास्त दु:ख दायक आहे. ज्या पध्दतीने तो डोके छिन्नविछिन्न झालेल्या अभिमन्युचे कलेवर आपल्या मांडिवर घेऊन रडतो ... सर्रकन काटा येतो अंगावर.

तरी हि कविता अर्धिच आहे. मुळ महाभारत मला परत मिळाले तर अभिमन्युने काय-काय परक्रम केला कोणा बरोबर लढला आणि जिंकला किंवा जखमी झाला तेहि लिहायला आवडेल मला वरती.