गुलमोहोरच्या फांद्यांतुन उतरावे जसे,
भिरभिरणार्या डोळ्यांचे बिलोरी कवडसे. - १
बिलोरी कवडश्यांना दाट काजळ रेषा,
तुझ्या डोळ्यात खोलवर माझ्या हरवलेल्या दिशा. - २
हरवलेल्या दिशांमध्ये सापडलेली वाट,
बकुळ-नाजुक देहाचा कमनिय घाट. - ३
घाटदार देहाला शैशवाचं कुंपण,
जागणार्या रात्रींना चांदण्यांचं शिंपण. - ४
चांदण्यांचं शिंपण नव्हे तुझे मंद स्मीत,
तुझ्या ओठी विरघळणारे सायंकाळचे गीत. - ५
सायंकाळच्या गीताला जगावेगळी हौस,
त्याच वेळी असा सुरु व्हावा पाऊस. - ६
पाऊस असा वेडापिसा भिजवी या देहा,
अंतरात जागलेली अनिवार स्पृहा. - ७
अशी स्पृहा जागावी तुझियाही दिठी,
अलगद गुंफाविस माझ्या भोवती मिठी. - ८
-सौरभ वैशंपायन.
4 comments:
aah, kyaa baat hain...
saurabh tu dhanya ahes... sagalya genre madhe lihina uttam jamata tula!!
धन्यवाद!
kya bat hai saurabh? mastach
अप्रतिम, उत्क्रुष्ट आणि खूप खूप मस्त लेखन आहे आपलं
Post a Comment