Thursday, March 10, 2011

"तू"

भरतीच्या दर्याच्या गाजेसारखी, तू
पायीचे पैंजण-घुंगरु वाजे तशी, तू
लाजाळू बुझताना लाजे तशी, तू
वेलीवरती इवले फुल साजे तशी, तू

श्रावणाचा रंगलुब्ध इंद्रधनू, तू
पावसात चिंब स्तब्ध गौरतनु, तू
निळ्याशार डोहातले प्रतिबिंब, तू
निळ्यागर्द नभामधले चंद्रबिंब, तू

 - सौरभ वैशंपायन

4 comments:

Anonymous said...

छोटीशीच पण छान झालीय कविता.

Anonymous said...

काय रे? सगळे कवी याच उपमा देतात. तुला काय वाटते तिच्याविषयी ते सांग आम्हाला. शब्दांनी कविता नाही रे बनत, तिच्यात तू, सौरभ, असला पाहिजे. छान छान शब्द वापरून वजन मिळाले आहे कवितेला, पण या 'तू' मध्ये तूच नाही, नुसते शब्द आहेत रे हे! कविता वाचताना तो लेख लिहिणार सौरभ नाही दिसत कुठेच.

BinaryBandya™ said...

छान झाली आहे कविता ..

Chinmay said...

मस्त रे सौरभ !!!
झकास

Chinmay Paranjape