Thursday, January 28, 2010

बकुळ

खुणा पावलांच्या तुझ्या,
गेल्या जळाने भरुन,
भरलेल्या खुणांतुन,
आले नभ उतरुन - १


गंध शरीराचा तुझा,
आला नवा बहरुन
बहरल्या गंधातुन,
आला बकुळ फुलुन - २

- सौरभ वैशंपायन.

1 comment:

प्रशांत said...

छान. आवडली.
आणखी एक दोन कडवी जमली तर मजा येईल.

पु.ले.शु.