Tuesday, May 11, 2021

संवाद

लहान बाळाने त्याच्या मुठीत आजोबांचे बोट पकडलेले आहे असा दोघांच्या फक्त हातांचा एक फोटो काही महिन्यांपूर्वी बघण्यात आला तेव्हा सुचलेली कविता आज ड्राफ्ट साफ करताना पुन्हा समोर आली. त्या क्षणी आजोबा नातवंडाशी/पतवंडाशी काय संवाद साधत असतील -

=====

एक चिमुकला स्पर्श मिटवतो,
आपुल्या काळामधले अंतर,
वृद्धत्व नव्हे हे दुजे बालपण,
दिलेस मजला याचे प्रत्यंतर.

अनुभवांच्या छिन्नीने त्या,
सुरकुत्या उमटल्या अंगांगावर,
खाच-खळगे टाळून साऱ्या,
ओतू बघतो तव हातांवर.

आपुले नशीब घडवी आपण,
की सटवाई लिही खरोखर?
एकाकडूनी दुसऱ्या हाती,
चालत राही डाव निरंतर.

काही सरले काही उरले,
आयुष्याचा खेळून चौसर,
माझ्या डोळ्यांमधली देतो,
तुजला काही स्वप्ने सुंदर.

- सौरभ वैशंपायन

कोई और नहीं मैं काल हूँ।


"काळ" आणि "मृत्यू" हे कायम मानवासाठी कुतूहलाचे अत्यंत गूढ विषय राहिले आहेत. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काळ आणि मृत्यू यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. दोघांना ओलांडून जाता येत नाही कारण त्यांना ओलांडले की परतीची वाट नाही.

मृत्यूवर विजय मिळविण्यासाठी मनुष्य शेकडो - हजारो वर्षं धडपड करतो आहे पण त्याला यश आलेलं नाही आणि येईल असं वाटत नाही. Time machine - कालयंत्र ही संकल्पना देखील कथा, कादंबरी आणि चित्रपटांपुरतीच.

मुळात "काळ" अशी काही गोष्ट किंवा चौथी मिती खरंच अस्तित्वात आहे की केवळ मानवाने गणिताच्या आणि इतर गोष्टींच्या आधाराने आखलेली एक संकल्पना आहे? इथपासून प्रश्नांची सुरुवात आहे.

आपल्या संस्कृतीत काळपुरुष अशी संकल्पना आहे. भावनिक दृष्ट्या काळपुरुष हा जणू गीतेतील स्थितप्रज्ञ आहे चांगले-वाईट, जय-विजय, प्रलय-सृजन याकडे तो समानदृष्टीने बघतो पण लौकिक दृष्टीने तो सर्वात अस्थिर आणि निरंतर गतिमान आहे.

पुढील कविता समजा उद्या काळपुरुष बोलू लागला तर काय म्हणेल याची केलेली कल्पना आहे. 
==========

अणु का अल्पांष हूँ मैं, 
मेरा अल्पांष है ब्रह्मांड ,
जीव-जंतु पलते मुझमें, 
दृश्य यह देखो प्रकांड।
मैं लय भी हूँ, प्रलय भी हूँ,
जन्म भी मैं, विलय भी हूँ,
मैं भ्रम भी हूँ, मैं भ्रांति हूँ,
शोर भी मैं, मैं शांति हूँ।
जो कट ना सके वो जाल हूँ,
कोई और नहीं मैं काल हूँ। - १

हर क्षण बदले वह वेश हूँ मैं,
बाटो फिर भी शेष हूँ मैं,
जो सोचो वह आकार हूँ,
हूँ सपना? या साकार हूँ?
मैं हूँ भूत और हूँ भविष्य,
उलझे सुर-असुर-मनुष्य,
तुम सबका मैं इतिहास हूँ,
जो अतृप्त रहे वो प्यास हूँ।
शायद खुद का ही खयाल हूँ,
कोई और नहीं मैं काल हूँ। - २

किसी की अपूर्ण आस हूँ,
या एक अंतहीन प्रवास हूँ,
मैं इस सृष्टि की नींव भी हूँ,
मैं हूँ सजीव, निर्जीव भी हूँ।
जो पूर्ण ना हो वो तलाश हूँ,
मैं ही अंधेरा, मैं ही प्रकाश हूँ,
खोजो आकाश, खोजो समुन्दर,
ढूंढो मुझको खुद के अंदर।
मन में गहरा पाताल हूँ,
कोई और नहीं मैं काल हूँ। - ३

घड़ी से तुम मुझ को बाँधोगे?
पर मेरी सीमाएँ कैसे लाँघोगे?
बाल्य और यौवन मैं देता हूँ,
सृष्टि को जीवन मैं देता हूँ।
विष और अमृत दोनों पीकर,
हर रोज मरा और हुआ अमर,
क्या हूँ दिशाहीन? या दृढ़ हूँ मैं?
पार्थ की तरह दिग्मूढ़ हूँ मैं।
मैं खुद के लिए एक सवाल हूँ
कोई और नहीं मैं काल हूँ। - ४

 - सौरभ वैशंपायन

सन्नाटा

.
सन्नाटा हूँ चौतरफा छाने में,
थोड़ी देर लेता हूँ,
पर जब छा जाता हूँ तब,
मैं सबकुछ घेर लेता हूँ। - १

खंडहरों में बसता है घर मेरा,
वहाँ गीत उदासी के गाता हूँ,
बिछु, साँप, उल्लू आते-जाते,
बाकी खुद को अकेला पाता हूँ। - २

कोई आहट दूर से आती मुझको, 
उसे बुलाने रोता - चिल्लाता हूँ,
फिर चार दीवारों से टकराकर मैं,
खुद में चुपचाप समा जाता हूँ। - ३

सन्नाटा हूँ! पर शोर भरा है मुझ में,
ढेर पर बैठो, तुम्हें जरा सुनाता हूँ,
आगे पीछे ऊपर नीचे पाओगे मुझको,
धीरे धीरे पर सबको बहुत सताता हूँ।- ४

चुपकर थामे हाथ सुने महल घूमता हूँ,
शाश्वत नहीं है जीवन याद दिलाता हूँ,
सन्नाटा हूँ मैं पुराने साज अपनाता हूँ,
सन्नाटा हूँ मैं सैकड़ों राज दफनाता हूँ। - ५

 - सौरभ वैशंपायन.