"तीची" कविता लिहिण्याचा प्रयत्न आहे.
___
स्तब्ध – लुब्ध दिन रात, थेंब थेंब पावसात,
चाहूल नव्या इंद्रधनुची, चिंब खुळ्या आकाशात – १
तू हि नवा मी हि नवी, अर्थ नवेला स्पर्शात,
तुझ्या आठवणींचा सडा, रोज राती अंगणात – २
मऊ सागराचा काठ, माझी सप्तपदि त्यात,
लाटा अंतरीच्या माझ्या, उमटल्या अथांगात – ३
-सौरभ वैशंपायन.
4 comments:
क्या बात है!
विशेषतः "तूही नवा मीही नवी, अर्थ नवेला स्पर्शात" आणि "लाटा अंतरीच्या माझ्या, उमटल्या अथांगात" या ओळी मस्तच आहेत.
पुलेशु.
-प्रशांत
मस्तच
नमस्कार,
आपण मराठी ब्लॉगर मेळाव्यात भेटलो होतो.
थोडा उशिर झाला सपंर्क करण्यास मात्र खरंच खुप छान वाटले त्यादिवशी भेटुन.
मी तुमचा ब्लॉगचे नाव लिहुन घेतले होते.
कृपया सपंर्कात राहावे.
नागेश देशपांडे
blogmaajha@gmail.com
blogmajha.blogspot.com
mastach :)
Post a Comment