कधी कधी विचारांच चक्र चालु होतं, विनाकारणच काही विचार डोक्यात घर करुन राहतात. मग डोक्यात विचारांची गर्दी होते आणि मुंबईच्या ट्रेन मधल्या माणसांसारखे ते बाहेर सुद्धा लटकू लागतात. मग अश्या बिचार्या विचारांना घर असावं म्हणुनच हा प्रपंच. फारसं काही सांगायच-लिहायचं नाहीये, तसंच मी लिहीन-बोलेन-सांगेन ते सगळ्यांना पटलचं पाहिजे असाही हट्ट नाहीये. हे माझे विचार आहेत, कोण्या एका क्षणी मला सहज सुचलेले ...... अगदी सहज!!!
Saturday, December 25, 2010
"नाताळाचे" माथी हाणू काठी ?
काल रात्री सांता घरी आला होता ..... पोतड्यातुन गिफ्ट काढून देत होता .... म्हणालो असली फालतु गिफ्ट्स नकोत ...... महिनाभर पुरतील इतके कांदे, भेंडी आणि टॉमेटो दे!! ...... आयला, मागणी ऐकुन झिट येऊन पडला ..... त्याच्या अगडबंब देहाला शुध्दिवर आणायला घराततल्या ६ कांद्यांपैकि २ कांदे त्याच्या नाकाला लावावे लागले!!! दुसरं काहितरी माग म्हणाला - म्हणालो "बरं मग निदान राहुल गांधीला थोडि अक्कल दे!" ..... या मागणीमुळे परत त्याच्या नाकाल उरलेले ४ कांदे लावावे लागले. ..... सांता बहुदा रीटायर होतोय ..... इतक्या महागाईत पिचलेल्या लोकांना "मेरी ख्रिसमस आणि "हॅप्पी" न्य़ू इयर!!!" कसं म्हणायचं? हे त्याला समजत नाहिये.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
वा! खूपच आवडलं! :)
खासच...
अगदी खरे लिहिलेस मित्रा...
Post a Comment