Tuesday, February 1, 2022

प्रश्न


मनात दबली काही रुखरुख,
न दिसणारे ठसठसते वळ,
हाताशी आधार न कुठला,
प्रत्येक वळणावरती भोवळ - १

पूल सांधणे अजुनी बाकी,
हितगुज बाकी आहे पुष्कळ,
पाऊल पहिले टाकावे कोणी?
या प्रश्नाशी अडले केवळ - २

- सौरभ वैशंपायन

No comments: