कधी कधी विचारांच चक्र चालु होतं, विनाकारणच काही विचार डोक्यात घर करुन राहतात. मग डोक्यात विचारांची गर्दी होते आणि मुंबईच्या ट्रेन मधल्या माणसांसारखे ते बाहेर सुद्धा लटकू लागतात. मग अश्या बिचार्या विचारांना घर असावं म्हणुनच हा प्रपंच. फारसं काही सांगायच-लिहायचं नाहीये, तसंच मी लिहीन-बोलेन-सांगेन ते सगळ्यांना पटलचं पाहिजे असाही हट्ट नाहीये. हे माझे विचार आहेत, कोण्या एका क्षणी मला सहज सुचलेले ...... अगदी सहज!!!
Wednesday, February 24, 2010
किमयागार
सचिनने कसोटित सलग चौथे शतक झळकवल्यावर मागच्या पोस्ट मध्ये मी म्हणालो होतो कि "सचिनद्वेष्ट्यांनी सचिनच्या नावाने बोटे मोडणे थांबवा कारण सचिन सगळ्याच्या पलीकडे गेलाय! उगीच तुमचे ब्लडप्रेशर वाढवुन घेऊ नका. सचिन इतकं क्रिकेट खेळलाय इतकं क्रिकेट खेळलाय कि उद्या एखाद्या सामन्यात लंच नंतर नॉन स्ट्रायकर एंड ला उभं राहुन दात कोरत कोरत एखाद - दुसरी ढेकर दिली तर तीहि त्याच्या रेकॉर्डवर येईल!" सचिन ते इतकं मनावर घेईलसं वाटलं नव्हतं. आज सचिन जे काहि खेळलाय ते आधी कोणी पाहिलं नव्हतं नंतर कोणी पाहिल याची शक्यता जवळपास नाहिये. आमच्या पिढीचं भाग्य आहे कि आम्हि सचिनला "लाईव्ह" खेळताना पाहतोय! दुपारि मॅच सुरु झाली तेव्हाच बाबांना म्हणालो - "तेंडल्या आज सेंच्युरी करणार!" आणि झालेहि तसेच, फरक फक्त इतकाच होता कि ती डबल सेंच्युरि होती. हा दुपटिचा फरक सुखावणारा होता.
"तो आला... त्याने पाहिले... त्याने जिंकले!" याहुन कमी किंवा जास्त सचिनच्या आजच्या द्विशतकि खेळीचे वर्णन करता येणेच शक्य नाहिये. आजवर सचिनला ज्यांनी खेळताना बघितले असेल.... सचिनच्या प्रत्येक फटक्यावर ज्यांचा जीव वरखाली होतो त्यांना माझे म्हणणे पटेल - "सचिनने सईद अन्वरचा १९४* चा रेकॉर्ड मोडल्याच्या आनंदाचा भर ओसरल्यावर २०० होईतो श्वास अडकल्यागत झाले होते. आतुन सचिन २००....सचिन २००" इतकच ऐकु येत होतं." युसुफ पठाण व धोनी सुध्दा आज पिसाळल्यागत खेळत होते, शेवटच्या दिड ओव्हर मध्ये धोनीने अशक्य फटकेबाजी चालू केली पण आज कोणालाहि धोनीच्या सिक्स बघायच्या नव्हत्या आज त्याने ६ बॉल मध्ये ६ सिक्स मारल्या असत्या तरि त्याचे कौतुक नव्हते. आज पाहिजे होते फक्त तेंडल्याचे द्विशतक. गेली अनेक वर्ष तमाम सचिनप्रेमींची एकच खंत होती अजुन.... या बादशहाच्या खजिन्यात ODI मधले द्विशतक नाहिये. आज सचिन द्विशतक करु शकला नसता तर लाखो अतृप्त आत्म्यांच्या पिंडाला कावळा शिवला नसता. आज साऊथ आफ्रिकन खेळाडुंना वेड लागायचं बाकि होतं, सेहवाग आऊट झाल्यावर भारताची पडझड होणार असं वाटत असतानाच सचिन मधला "सच्चिन" जागा झाला व त्याने कार्तिक, पठाण आणि धोनी बरोबर साऊथ आफ्रिकेला पार झोपवले. त्सुनामी किंवा चक्रिवादळानंतर एखाद्या प्रदेशाची जी हालत होते तीच अवस्था आफ्रिकन संघाची झाली आहे, भारत सरकारने त्या बद्दल त्यांना तात्काळ नुकसान भरपाई दिली तरि कोणीहि विरोध करणार नाहि. शिवाय सगळ्यांनी BCCI ला जाहिर आवाहन केले पाहिजे कि साऊथ आफ्रिकन खेळाडुंना विमनस्क आणि बधीर अवस्थेतुन बाहेर काढायला जगातले उत्तमोत्तम मानसोपचार तज्ञ त्यांनी बोलावुन घ्यावेत. कारण आत्ता त्यांची चाचपडणारी बॅटिंग बघताना जाणवतय कि ते आजच "शिमगा" साजरा करणार. इच्छा हिच आहे कि त्यांना १५० मध्ये गुंडाळुन आपण सचिनला मोठ्ठि भेट दली पाहिजे.
क्रिकेट हा भारतीयांचा धर्म आहे आणि सचिन हा देव! सचिन पीचवर असतो तेव्हा त्याच्या प्रत्येक फटक्यावर १०० करोड हृदये आंदोलने घेत असतात. तो नव्व्याणव वर असताना तेहतीस कोटि देव पाण्यात ठेवलेले असतात, लाखो ओंजळी त्याच्याकरता "दुआ" मागत असतात. त्याचे प्रत्येक शतक - बॉम्बस्फोटाने जखमी झालेल्या, महागाईने पिचलेल्या, भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या आमच्या मनावर तात्पुरती का होईना फुंकर घालते. आणि त्याबदल्यात आम्हि त्याला फक्त "थॅंक्स" देऊ शकतो.
सचिन आता शतकांच्या शतकापासून केवळ ६ शतके दूर आहे. आणि आता तो दिवसहि दूर नाहिये हे गेल्या महिना भरातील त्याच्या खेळावरुन दिसतय. आता माझ्यासारख्या अजुन काहि अतृप्त आत्म्यांची एकच इच्छा आहे - २०११ चा वर्ल्डकप सचिनच्यासकट भारताने जिंकावा.
- सौरभ वैशंपायन.
Labels:
क्रिकेट
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
मला फ़क्त संजय मांजरेकर नावाच्या पिल्लाला पहायचे आहे , म्हणे सचिनला टीम मधून काढून टाका त्याचा फॉर्म गेला आहे , परंतु " Form is Temporary Class is Permanent "
सौरभ छान लिहिलयस. पण, खालील नावात थोडा बदल हवाय. "आफ़्रिदी" च्या जागी "सईद अन्वर" हे नाव हवं ना..?
"सचिनने आफ्रिदिचा १९४* चा रेकॉर्ड मोडल्याच्या आनंदाचा भर ओसरल्यावर २०० होईतो श्वास अडकल्यागत झाले होते.
bhushan,
केलं बरोबर काल लिहायची इतकि घाई झाली होती कि अन्वर ऐवजी आफ्रिदि लिहिलं. तरि सगळिकडे दुनियाभर अन्वरच्या बैलाला घो देत फिरत होतो पण इथे लक्षात आलं नाहि.... धन्यवाद! [:-p]
Sau khup chal lhila aahes.. mastaa ekdaam sahi... keep going yaar..
Zakkas lihil ahes.Aaj wachala milal.
Tu mhanatos tas he mis zal asat tar pindala kawala shiwala nasata.
kip et ap
Post a Comment