आत्ताच भारत विरुध्द इंग्लंडची मॅच "टाय" झाली. पण आज पहिल्यांदा जिंकलो नाही तरी खूप दुख झाले नाही. आज ना भारत जिंकला ना इंग्लंड जिंकू शकले ..... पण आज क्रिकेट जिंकलं. खरतर माझा मित्र अमोल म्हणाला तसं Poor Bowling by India + Poor Batting by England = TIE. पण मज्जा आली हे नक्कि. बॅटिंग पॉवरप्ले चालू झाला तेव्हा बॉल्स आणि जरुरीचे रन्स यात केवळ ९ चा जास्तीचा फरक होता. बाबा वैतागुन म्हणाले "अरे गेली मॅच .... बंद कर ... कसं बघवतं तुला???" पण आत कुठे तरी "पिक्चर तो अभी बाकि है मेरे दोस्त!" असंच वाटत होतं. तेच झालं, झहिर खानने लाज वाचवली .... म्हणजे श्रीकृष्णाने द्रौपदिची लाज वाचवली तशी नव्हे .... बॅटिंग पॉवर प्ले मध्ये झहीरची एन्ट्रि ही "दिवार" मधल्या अमिताभ सारखी होती. दिवारमधल्या एका सीन मधे बंद होणार्या लिफ्टच्या दरवाज्यात बुट टाकून जसा अमिताभ दरवाजा उघडतो आणि आत जातो, तश्शीच तंगडि त्याने इंग्लंडच्या विजयात घातली.
शेवटच्या ८ ओव्हरचं तर्पण यांत्रिकपणे देऊन या सामन्याचं श्राध्द घालावं लागणार हे दिसत असताना, संजिवन मंत्र म्हणून कोणीतरी चमत्कार घडवावा तसं काहीसं झहीरने आणि मागुन पियुष, मुनाफ च्या १-१ विकेटने केले.
काय काय झालं त्याची जंत्री देत नाहि, पण अनेक वर्षांनी असा सामना बघायला मिळाला. अनिश्चितता तरी किती असावी??? ४९व्या ओव्हरमध्ये पियुश चावलाच्या दोन बॉल्सना थेट प्रेक्षकांत सैर करुन आणल्यावर परत "मॅच गेली! बोंबला!!" म्हणून डोक्याला हात लावला. शेवटच्या ओव्हरमध्ये मुनाफवर कित्ती प्रेशर असेल?? याची कल्पनाही करवत नाही. अनेकदा करीयर खराब होते बिचार्या खेळाडुची. पण मुनाफने शांत डोक्याने बॉलिंग केली. वेल डन बॉय!
असो, मॅच झक्कास झाली, सचिन आणि स्ट्रॉसची बहाद्दर शतकि खेळि, ब्रेसनन, झहीर ची बॉलिंग, वा!!! सगळ्यांनी प्रत्येकि चार चांद लावले आणि निदान आजच्या दिवसा करता पृथ्वीला गुरु पेक्षाहि जास्त चंद्र दिले असंच म्हणावं लागेल. मात्र दोन्हि संघांच्या बॅट्समननी शेवटि माती खाल्ली हे मात्र खरं.
जाता जाता - धोनी टॉस जिंकू शकतो व आपले बॉलर्स ऐनवेळि "कम- बॅक" करु शकतात हे आज समजल! ;-D
- सौरभ वैशंपायन.
1 comment:
बॉलर्स पैकी फक्त झहीरवर माझा विश्वास आहे ..
बाकीचे काय करतील सांगता येत नाही
Post a Comment