Friday, January 14, 2022

स्पंदन

 

एकांताची वेळ असावी 
चंद्र दडावा मेघांमागे,
अबोल रात्री अवचित व्हावे 
दोघांमधले स्पंदन जागे. - १


कानामागील केसांमध्ये
जड थोडासा श्वास जिरावा,
अवघडलेल्या मौनामध्ये 
शरणागत हुंकार विरावा. - २


अनोळखीश्या दो देहांना
क्षणात यावी अनाम भरती,
उत्सुक उत्सुक हात फिरवे
अंगांगातील वळणांवरती. - ३


अधीर आसुसल्या ओठांना
ओठांकडूनीच धीर मिळावा,
संकोचाच्या पडद्यामागील
कुशीत दडला अर्थ कळावा. - ४

 - सौरभ वैशंपायन

No comments: