Friday, January 14, 2022

समास


गोऱ्या भाली रेखलेली, 
काळ्या बटांची आरास,
मिठीतुन उलगडे, 
दोन देहांचा समास. - १


शब्द झाले मुके मुके,
गुंते श्वासामध्ये श्वास,
तनुवरी तुझ्या चाले,
माझ्या ओठांचा प्रवास. -२


उतू गेला नभी चंद्र,
फुले वसंताचा मास,
दोन क्षणांमध्ये दाटे,
युगायुगांचा उल्हास. - ३


नाही फुलांचा सुवास,
तरी गंधाळली आस,
दिनभर देहभर आता,
तुझ्या स्पर्शांचेच भास. - ४

 - सौरभ वैशंपायन

No comments: