Wednesday, April 27, 2011

पुन्हा .....

पुन्हा ती नव्याने आली समोरी, पुन्हा जागली जुनी अंतरे!
पुन्हा खेळ चाले नव्याने सुखाचा, जुन्या वेदनेला ना अंत रे ॥धृ॥


असे काय झाले? कळेना कुणाला, परी सांभाळली उरी खंत रे,
नवी पालवी ही जुन्या भावनेला? कि अखेरीस पुन्हा आकांत रे? ॥१॥


पडावा कवडसा तिच्या आठवांचा? पुन्हा न व्हावी दिक्‌ - भ्रांत रे!
अस्वस्थतेने मी असा वेढलेला जरी भासवितो वरी शांत रे. ॥२॥

 - सौरभ वैशंपायन.

3 comments:

BinaryBandya™ said...

अस्वस्थतेने मी असा वेढलेला जरी भासवितो वरी शांत रे.
मस्तच ...

Reshma Apte said...

solidessssssss :)

apratim shabdanche khel अंतरे .... अंत रे

प्रशांत said...

>>अस्वस्थतेने मी असा वेढलेला जरी भासवितो वरी शांत रे<<

superb